लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी काल महाराष्ट्रातील १४ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. यामध्ये मराठवाड्यातील जालना आणि औरंगाबाद या मतदारसंघाचाही समावेश होता. मराठवाड्यात सकाळी मतदान करण्याला मतदार प्राधान्य देत होते. दुपारी उन्हाच्या कडाक्यामुळे मतदान काहीसे मंदावले. परंतु, चार वाजेनंतर मतदारानी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. रांगेत उभ्या असलेल्या मतदारांना सहा वाजल्यानंतरही मतदानाचा हक्क बजावण्याची मुभा देण्यात आली होती. त्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर रात्री उशिरापर्यँत मतदान सुरु होते. यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी हाती आली नव्हती. आज सकाळी मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर करण्यात आली. जालन्यामध्ये ६४.५० % तर औरंगाबादमध्ये ६३. ४१ % मतदान झाले.
औरंगाबाद व जालना लोकसभा मतदारसंघात विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान खालीलप्रमाणे
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ
कन्नड: ६४.८० %
औरंगाबाद (मध्य): ६२.१९ %
औरंगाबाद (पश्चिम): ६२.७८ %
औरंगाबाद (पूर्व): ६२.८० %
गंगापूर: ६५.८९ %
वैजापूर: ६२.०७ %
जालना लोकसभा मतदारसंघ
जालना: ५२.८२ %
बदनापूर: ६७.५२ %
भोकरदन: ६९.०१ %
सिल्लोड: ६३.२६ %
फुलंब्री: ६६.३४ %
पैठण: ६९.१६ %